प्रसारमाध्यमे आणि प्रचारमाध्यमे 1 - By Manasi
कला ह्या प्रकाराला जसं मनोरंजनाच्या हेतूने बघीतलं जातं तसचं कलेचा वापर आपले विचार तत्त्वं लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी देखील वापरला जातो. कलाप्रकार म्हणुन मालिकांचा विचार केला की, असं लक्षात येतं की, वरवर पाहता लोकांना असं जरी वाटत असलं की, मालिका ह्या आम्ही मनोरंजनासाठी पाहतो असं ते म्हणत असलं तरी, त्यात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींचा परिणाम कळत नकळत लोकांवर होतो. आपले जे विचार आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न व मार्ग म्हणून देखील कलाप्रकारांचा वापर केला जातो.
मराठी T.V channel वर ज्या मालिका दाखवल्या जातात, त्या एका दृष्टिकोनातून, एका ठराविक विचारांच्या व सर्वसामान्य लोकांना जे विचार पटतील त्या हेतुने दाखवल्या जातात. ह्या सर्व मालिकांचे विषय हे एका ठराविक साच्यातले असतात, केवळ थोड्याफार गोष्टी बदलुन बाकी गोष्ट मात्र सारखीचं असते. ह्याला काही मालिका अपवाद देखील आहे. पण साधारणतः सर्व मालिकांमधुन एकाच प्रकारच्या विचारांचा मारा केला जातो.
त्यात काही गोष्टी ह्या सारख्या असतात.
१. बळजबरी ठरवलेली लग्न - arranged marriage चं योग्य आहे आणि आपले घरातले जो जोडिदार आपल्यासाठी निवडतात तोच योग्य देखील असतो.
२.ही लग्न ही जातीमध्येच होतात. वेगळ्या जातीतील मुलासोबत आणि मुलींसोबत कोणी लग्न करतयं किंवा लग्न ठरवलं जातयं ही गोष्ट दाखवली जात नाही. त्यामुळे वेगळ्या धर्मातील मुलासोबत व मुलीसोबत लग्न होताना दाखवनं ही तर खुप कठिण गोष्ट आहे.
३.सुपर वुमन ही संकल्पना अजुनही प्रभावीपणे ठसवली जाते.
४. एकत्र कुटुंब हेच चांगलं आहे अशं दाखवलं जातं. संयुक्त कुटुंब हे वाईट असं दाखवण्याकडे कल दिसुन येतो.
५.हिंदु धर्मातील वरच्या जातीतल्या कुटुंबावर आधारित व वरच्या जातीतील समाजाला केंद्रस्थानी ठेऊन मालिकांचे विषय
६. हळदीकुंकु, सत्यनारायण पुजा यासारख्या हिंदु धर्मातील ब्राम्हणी संस्क्रुती, परंपरा इत्यादी गोष्टी दाखवुन त्यांचे सार्वित्रिकीकरण करण्याकडे कल.
Comments
Post a Comment