प्रसारमाध्यमे आणि प्रचारमाध्यमे 2 - By Manasi


सर्व साधारण पणे जेव्हा आपण कोणताही कला प्रकार बघतो तेव्हा त्या कलाप्रकारामध्ये केवळ कला नसते तर त्यासोबत आपले विचार, तत्त्वं लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी देखील वापरला जातो.त्याच बरोबर सामाजिक, राजकिय व्यवस्थेचाही कलाप्रकारांवर परिणाम होत असतो. आपण एक कलाप्रकार म्हणून मालिकेचा विचार केला तर एकच एक प्रकारची मांडणी दिसुन येते. जो समाज सत्तेत उच्च पदावर आणि प्रबळ असतो त्या समाजाने तयार केलेल्या आणि घालुन दिलेल्या चौकटींमध्येच ते कथानक बसवलं जातं. 

मराठी मालिकांच्या बाबतीत बघताना असे दिसून येते की, मालिकेमध्ये जी स्त्री पात्रे दाखवली जातात किंवा जी कथा घडताना दाखवली जाते ती सध्याच्या काळातली progressive content असणाऱ्या मालिका समजल्या जातात किंबहूना असं बिंबवलं जातं. त्या मालिकाही ह्या पुरुषप्रधानव्यवस्थेचा प्रभाव असणाऱ्या पार्श्वभुमीवर आणि त्याच परिप्रेक्षात घडत असतात. मालिकांच्या प्रक्षेपणाच्या वेळा जर पाहिल्या तर असेच विचार ठासवणाऱ्यामालिका ह्या prime time मध्ये दाखवण्यावर भर दिसुन येतो. आणि याचेही राजकारण असते. 

माझ्या अनुभवावरुन असं लक्षात आलं की, जे मालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर दाखवलं जातं आणि प्रसंगी ते चुकिचं ही असू शकतात त्या सतत दाखवून प्रेक्षकांवर ते विचार बिंबवले जातात. आणि म्हणून असं वागणं बरोबर आहे असं प्रेक्षकांना वाटू लागतं. उदाहरणार्थ सरसकटपणे घरातल्या कामांना romanticize करून त्यांची लैंगिकतेवर आधारित केलेली विभागणी. 

सध्याजर आपण प्रत्येक मराठी channel वर दाखवल्या जाणाऱ्यामालिकांचा प्रकार पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते की काही ठराविक प्रकारांच्या मालिका दाखवण्यावर भर दिसुन येतो. तो म्हणजे असा की,

. प्रेम कहाणी आणि ती ही compulsory heterosexual, arranged marriage.  

. एकत्र कुटूंब पध्दती वर जास्त भर देऊन ती कुटूंब पध्दती कशी चांगली आहे हे दाखवणे.

. देव-देवतांवर आधारित मालिका.

. मनोरंजनाचे कार्यक्र्म पण ते ही फक्त लग्न, कुटूंब ह्या परिपेक्षात घडणारे. 


ह्या मालिकांमधील कथानक हे हिंदू,उच्च जातीय आणि उच्च वर्गीय कुटूंबाभोवती फिरते. आणि जरी कुटूंब हे उच्च वर्गीय नसलं तरी ते उच्च जातीतलचं असतं. पुरुषप्रधान संस्क्रुतीमध्ये जसे स्त्रिया आणि खालच्या जातीतल्या लोकांना  महत्त्व दिलेलं नाही तसेच ते मालिकांच्या कथानक दिसुन येते. 

काही मालिकांची उदाहरण बघीतल्यास ह्या गोष्टी लक्षात येतात,

.लग्नाची बेडी-  मुलींना जास्त शिकु देणं शिकल्या तर त्या हाताबाहेर जातील आणि आपल्याला त्यांना कंट्रोल करता येणार नाही. शिक्षणापेक्षा घर म्हणजेच संसार संभाळण महत्त्वाच. त्यांची पहिली प्रायोरिटी संसार ही असावी. 

स्री ची जबाबदारी आणि तिचं संरक्षण करायला केवळ पुरुषचं लागतो. म्हणजेच लग्नाच्या आधी वडीलांनी संभाळायचं, नंतर नवरा आणि मग नंतर मुलगा संभाळणार. पुरुषाशिवाय स्त्रिच्या आयुष्याला महत्त्व नाही. 

.माझ्या नवर्याची बायको, आई कुठे काय करते - पाश्चिमात्त्य कपडे घालणाऱ्या बायका आणि शिकलेल्या बायका ह्या नेहमी घर तोडायला, दुसर्यांच्या नवर्यांवर लक्ष ठेऊन असणार्या, पैश्यासाठी संबंध ठेवणार्या, स्वयंपाक येणाऱ्या असतात. 

.राजा राणीची गं जोडी, या फुलाला सुगंध मातीचा - नवरा किंवा सासरचे मुलीला शिकु देतात किंवा नोकरी करुन देतात. म्हणून त्याचं / त्यांच्या घरच्यांचं सगळेजण कौतुक करतात. तेच जर तिने सगळ्यांना झुगारून स्वतःचे हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला तर ती मुलगी वाईट ठरते. पण तिने तिचे निर्णय घेता, बाकिचे खास करून आई-वडिल किंवा सासरच्यांनी तिच्या आयुष्याचे जे निर्णय घेतील त्यात समाधानी रहायचे.

.जुळून येती रेशीम गाठी, सुंदरा मनामध्ये भरली -  आईवडिलांच्या मनाप्रमाणे जर लग्न केलं तर संसार सुखाचा होतो, हवं ते सगळं मिळतं. Compulsory heterosexual marriage.

.ठिपक्यांची रांगोळी, जुळून येती रेशीमगाठी, सहकुटूंब सहपरिवार, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? - एकत्र कुटूंब पध्दती.

.तुला पाहते रे - Compulsory heterosexual marriage मध्ये पण मुलगा मोठा आणि मुलगी लहान, मुलगा श्रिमंत आणि मुलगी गरिब दखवलं जातं. म्हणजे परत तेच की, 

. काहे दिया परदेस - मुलगी संसारासाठी तिचं काम आणि घर स्वखुषीने सोडते आणि ते ग्लोरिफाय केलं जातं. 

. जय मल्हार, जय हनुमान - ह्या सारख्या ज्या हिंदु धर्मातील देवदेवतांवर आधारित मालिका आहेत त्याद्वारे हिंदू धर्माचे सरसकटीकरण केले जाते. हिंदूत्व रुजवण्याचा प्रयत्न दिसुन येतो. ज्या कथा खऱ्या नाही आहेत त्या खऱ्या आहे असं दाखवण्यावर त्यांचा जोर असतो. तसेच ज्या इतर मालिका आहेत त्यामध्ये सुध्दा हळदीकुंकू, सत्यनारायणाची पुजा,मंगळागौर,पहिली मकरसंक्रांत साजरी करणं, डोहाळे जेवण ह्यासारखे जे हिंदू उच्च जातीय सण,धार्मिक विधी आहेत ते ही ग्लोरिफाय करून त्यांचं सार्वत्रिकीकरण केलं जातं. 


. होम  मिनिस्टर, स्मार्ट सुनबाई - असे जे मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत त्यातुन देखील हिंदू कुटूंब पध्दती,  Compulsory heterosexual marriage वर भर दिला जातो. आणि अश्या कार्यक्रमांद्वारे त्यांना ग्लोरिफाय पण केले जाते.


आत्ताच्या ज्या आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्यासर्वच मालिकांमध्येसुपर वुमनची संकल्पना अजुनही दिसुन येते. उदाहरणार्थराजा राणीची गं जोडीह्या सारख्या अनेक मालिका आपल्याला बघायला मिळतील. जवळपास सर्वच मराठी, हिंदी भाषिक मालिकांमध्ये बघायला मिळतील. 

सौभाग्यवती असणं हे किती महत्त्वाचं आहे हे ह्या सर्व मालिकांमधुन दाखवलं जातं. आणि विधवेचं जे चित्रण केलं जातं ते नेहमी बिचारी, कष्टकरी असे केले जाते आणि ति़च्या तोंडूनचं सौभाग्यवती असण्याचं महत्त्व सांगितलं जातं. जेव्हा विधवा बाईच्या आयुष्यात दुसरा पुरुष येऊ शकतो तिलाही संसार सुख मिळू शकत असं दाखवणारी जीअग्गंबाई सासुबाईही मराठी मालिका आली तेव्हा लोकांनी त्या मालिकेवर टिका केली. पण तरीही हिंदू वैवाहिक पध्दती आणि  Compulsory heterosexual marriage च्या माध्यमातूनच स्त्री च्या आयुष्याला अर्थ मिळतो आणि तिला सुख मिळते असे बिंबवण्याचा पण प्रयत्न होताना दिसतो. पण विधवा स्त्री च्या आयुष्यात दुसरा पुरुष येऊ शकतो आणि आला तर ते नातं स्विकारायला पाहिजे असं त्यांनी दाखवलं आहे. त्याचबरोबरआई कुठे काय करतेह्या मालिकेवर सुध्दा लोकं टिका करताना दिसतात कारण त्यात स्त्री स्वतः घटस्फोटाचा निर्णय घेते आणि वेगळी राहते. ह्या सारख्या मालिका ज्या थोडं वेगळं चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतात त्या ठरवून बघण्याकडे लोकांचा कल दिसुन येतो.


खाजगी आणि सामाजिक असे जे दोन भाग पुरुषप्रधान व्यवस्थेने पाडले आहेत. तेच भाग अतिशय ठाशिव पणे मालिकांमध्ये दाखवले जातात. मालिकेचं संपुर्ण कथानक खाजगी परिप्रेक्षातचं घडतं. पण मुळातचं खाजगी आणि सार्वजनिक असे जे दोन भाग आहेत ते लिंगाधारित विभाजनावर आधारित आहे. त्यामुळे मालिकांमध्ये स्त्रिया नेहमी खाजगी परिप्रेक्षात दाखवले जातात आणि तेच प्रेक्षकांच्या मनावर बिंबवले जाते की स्त्रिया ह्या नेहमी खाजगी परिप्रेक्षात त्यांची जागा आहे. 

ह्या वरून असं दिसतं की ह्या ज्या मालिका आहेत त्या राजकिय आणि सामाजिक प्रबळ जे गट आहेत त्यांची उघडपणे प्रचारमाध्यमे बनली आहेत. आत्ताच्या राजकिय वातावरणाच्या विचारसरणीच्या अनुषंगाने, त्याच्या साच्यात बसेल अश्या मालिका सध्या दाखवण्याकडे कल दिसून येतो. 


Comments

Popular posts from this blog

Indian Sanitary Napkin Ads: No Change to Some Change by Shivangi Saxena

The politics of classical recitals: A proscenium perspective

Depiction of Homosexuality in Indian Mythological Literature by Shivangi Saxena